वारी म्हणजे काय हो?पायी पायी जावून घेतलेले विठ्ठलाचे दर्शन
की माऊली माऊली जपत केलेलं भजन ?
टाळ आणि मृदंगाच्या तालावारचे रिंगण
की देह-भान विसरून केलेलं नामस्मरण ?
संतांच्या गावातल्या पालखीच्या भेटी
की नम्रतेन राहण्याचा अनुभव गाठी ?
तुळशी माळेसारखी दृढ असणारी पांडुरंगाची ओढ
की स्वतःच घेतलेला सगुणाचा शोध ?
संसार आणि परमार्थाचा घातलेला मेळ
की विश्वासान चालवलेला श्रद्धेचा खेळ ?
वारी म्हणजे,
प्रत्येकाला अंतर्मनाने जोडणारा धागा
आणि वारकर्यासाठी एक माहेरपणाची जागा...I
.jpg)

