आज बऱ्याच दिवसांनी एका खूप जवळच्या मैत्रिणीला phone केला . आधी formal संभाषण सुरु झाल आणि मग हळूहळू दोघींनी पण cassete टाकली . अगदी शाळेपासूनच्या गोष्टी आठवत आठवत मग अगदी संसारा पर्यंतच्या गप्पा मारल्या . मनसोक्त हसलो ,एकमेकीना सल्ले दिले,अगदी वय विसरून चेष्टा मस्करी पण केली कुणाकुणाची...खूप मस्त वाटल...मग शेवटी phone ठेवायला नकोच वाटायला लागला. पण काय करणार? वेळेच भान ठेवायलाच पाहिजे न ?
phone ठेवल्यावर मात्र खूप एकट वाटायला लागल बराच वेळ ...मी विचारात पडले, प्रत्येकाला एखादी तरी जागा हवी मन हलक करायला ... अशी एखादी व्यक्ती किंवा मैत्रीण हवी आयुष्यात कि जिच्याशी आपण आपला मुखवटा न वापरता बोलू शकू, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू , अगदी मोठेपणाच्या सगळे अंतर तोडून ...! सरत्या वर्षाचा निरोप घेता घेता आज एका गोष्टीचा शोध लागला ...
एखादी तरी व्यक्ती हवी आयुष्यात
तुमचे बंध जिथे सहजच जुळावेत ,
कधी वाटेल आता उघडावं अंतरंग
ते न सांगता तिच्या ओठून पडावे ...
