Pages

Tuesday, 22 July 2014

इंटरनेटचा जमाना


माझा teenage भाऊ पार्थ , जी उत्तरे देतो घरातल्या सगळ्यांना ती उत्तरे या कवितेमधून ...ही कविता सध्याच्या तमाम teenagers च्या प्रेरणेतून ;).






आई म्हणते, ' जरा माणसांच्यात मिसळत जा... '
facebook  chatting मुळे  सगळ्यांच्यातच असतो मी !


बाबा म्हणतात ' जरा अंग मोडून खेळत जा... '
हातातल्या tab  वर 'FiFa -world  cup ' च खेळत असतो मी !




मावशी ओरडते 'थोडे general knowledge वाढवायला हव... '
अग मावशी, Google केल्यावर सगळी उत्तर मिळतात !


काका म्हणतात ' दररोज बातम्या ऐकत जा... '
त्या तर रोजच्या tweets च असतात !






            दीदी म्हणते  ' सुट्टीत  Dance क्लास लाव ...'
             Youtube चे  Dance video स्टेपनुसार येतात !

            दादा म्हणतो 'चल जरा relatives कडे काम आहे...'
            कशाला जायचं? What 's up  ला message टाक  ना !



किती बिचारे आहेत सगळे , नेमकं काय समजतात मला ?
इंटरनेट च्या जमान्यात, हातावर operate  करता येत जगाला  :)

सगळ काही clicks वर करू ,अभ्यासापासून shopping पर्यंत
Feelings पण 'share ' करता येतात year -start पासून year - end पर्यंत...!

google - what's up  - facebook मित्रच आहेत आपले
सणवार, जयंती ,बर्थडे  साजरे करतात सगळे :)

अजून किती social राहू ? माझ्या social networking मध्येच  उत्तर आहे,
तुम्हालाच बदलायला हव आता , हा Wi - Fi  चा जमाना आहे ...!!!






Monday, 16 June 2014

"जगात भारी कोल्हापूर !"

तसं तर प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनात कोल्हापूर विषयी अभिमान आहेच आणि  बऱ्याच जणांनी आपल्या कवितांमधून कोल्हापूरची ओळख  सर्वाना करून दिलीच आहे. तसाच माझाही हा एक छोटासा प्रयत्न....






महालक्ष्मिच्या  गळ्यातला साज कोल्हापूर
रांगड्या भाषेचा आवाज कोल्हापूर

शाहूराज्यांच्या अष्टपैलू धोरणी वाटचालीच कोल्हापूर
जोतिबाच्या यात्रेमध्ये सासनकाठी नाचवणार कोल्हापूर





वाटीमधून सांडणारा तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर
खासबाग मध्ये रंगणारा कुस्तीचा डाव कोल्हापूर

राजारामपुरीत पोरींच्या मागून टाकलेला lap कोल्हापूर
मंडळासाठी जागवलेली गणपतीतली रात्र कोल्हापूर






रंकाळ्यात पडलेल शालिनी palace  च प्रतिबिंब कोल्हापूर

 रावनेश्वराच्या पिंडीसमोर चाललेल्या आरतीचा ताल कोल्हापूर





                                                                             
पाटाकडील आणि दिलबहारमध्ये झालेली शाहू stadium  ची match कोल्हापूर

शिवाजी university मध्ये मिळणार शिक्षण कमी अभ्यास जास्त कोल्हापूर

गुरालातल्या काहिलीमध्ये तयार होणारा गोडवा कोल्हापूर

भवानी मंडपातल्या दहीहंडीसाठी जमणारा ताटवा  कोल्हापूर




तमाशापेक्षा लावण्यावारती  प्रेम करणार कोल्हापूर
पायातल्या कोल्हापुरी पायाताणाची करकर कोल्हापूर

पावसाळ्यामध्ये  खुलणार  पन्हाळ्याच  सौदर्य कोल्हापूर
सामाजिक हितासाठी औदार्य दाखवत झटणार कोल्हापूर



प्रत्येक कोल्हापुर्कराच्या मनामध्ये सुंदर घर करणार कोल्हापूर
कधीही गेलात तरी कुणालाही सहज सामावून घेणार कोल्हापूर ...

असं हे आमच जगावेगळ कोल्हापूर
असं हे आमच "जगात भारी  कोल्हापूर !"


Wednesday, 28 May 2014

Happiness can be found in little things! "





                      आज नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले. आज उशीरच झाला तसा,साधारण ८ ची वेळ असेल. मस्त वातावरण होत. छान वारा सुटला होता,आभाळ भरून यायला लागल होत. आमराई जवळ आली तसं अजून छान वाटू लागल....पक्ष्यांचे आवाज....पाऊस  येणार म्हणून चाललेली धावपळ ... फुलपाखरांच्या इकडून तिकडे गिरक्या ...सगळ काही छान चालू होत.

                      पण एक मजेदार गोष्ट म्हणजे, चार आजोबांचा एक ग्रुप jogging नंतर मस्तपैकी आमराइतले आंबे पाडण्यात गुंग होता :) पाडण्यात म्हणंजे दगड किंवा काठीने आंबे पाडण्यात नव्हे ....पण सगळे आजोबा वारा यायची वाट बघत . मग वाऱ्याने  एखादा आंबा पडला कि तो पिशवीत घालत. हातातल्या चाकूने आंबा कापून खाता-खाता एखाद्या  विनोदावर सगळे खळखळून हसत.

                       असा कितीतरी वेळ त्यांचा दंगा चालू होता. मला खूप energy  आली त्यांच्याकडे बघून. किती enthusiastically त्यांचा तो खेळ चालू होता ! मला लहानपणीचे दिवस आठवले . आणि दोन मिनिटे असंही वाटल की कित्ती भरभरून जगतात हे ! आपण बऱ्याचदा मनात आलेल्या  गोष्टी  करायच्या टाळतो ....आपल्यासाठी so called  'वय ,status ,वेळ ,लोक काय म्हणतील ' अशा बऱ्याच गोष्टींची भीती असते. पण जर अशा थोड्या गोष्टी ज्या आपण करू शकतो ( आणि ज्याने कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही ) त्या केल्या तर त्या छोट्या गोष्टी कदाचित खूप आनंद देवून जातील . नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे, "Enjoy  the  little  things ...for  one  day  when  you  look back , you  will  realize  they  were big things !"




Tuesday, 28 January 2014

त्याचा वाढदिवस






त्याच्या वाढदिवशी आज देवाकडे एक मागण आहे
कारण तो म्हणजे माझ्यासाठी श्वास आणि जगण आहे...!

त्याच्या वाट्याला नेहमी उतुंग यशाची गुढी असो,
त्याच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदाचे हसू असो
त्याच्या हातून नकळत सत्कार्याला मदत असो
त्याने पाहिलेल्या स्वप्नांना पूर्णत्वाची हमी असो
उदंड आयुष्य मिळो त्याला हे मनापासून सांगण आहे...
कारण तो म्हणजे माझ्यासाठी श्वास आणि जगण आहे...!




चांगले  आरोग्य,सुख -समृद्धी सोबतीला  नेहमी राहो
आयुष्य बहरून जाईल अशी नाती मिळत जावोत 
आलेच जरी संकट तरी त्यातून तरायची पुण्याई राहो
मोठ्यांचे आशीर्वाद निरंतर गाठोडीला जमत जावोत
सुंदर असावं आयुष्य त्याच यासाठी देवाकड साकड आहे...
कारण तो म्हणजे माझ्यासाठी श्वास आणि जगण आहे...!