बाळ जन्माला आल्यापासून तो चालू लागेपर्यंत त्याच्यामध्ये खूप सहज आणि भरभर बदल होत जातात .बाळाला एक ते दीड वर्षाचे होताना पाहणे म्हणजे छोट्याश्या कळीचे हळूहळू फुलात नव्हे तर फळात रुपांतर होताना पाहण्यासारखेच आहे! पण हे दिवस आईला कधी भरभर जातील असे वाटते . आणि बाळाचे उद्योग सुरु झाल्यावर वाटते की आधीचेच दिवस बरे होते...!
पण बाळाला असे काहीच मनात येत नसणार ....कारण त्याला कुठे एवढ काही कळत असतं? ते तर खूप निरागस आणि हसणारं पिल्लू असतं सगळ्याचं. पण जर त्याला सांगता आलं असतं तर त्याने असं सांगितलं असतं कदाचित....
कधी काय सांगेल हे तिचे तीलाच कळत नाही
काय माहीत अशी का अधूनमधून वागते आई
दुपटया मध्ये मी होतो तेव्हा
बसेन कधी असे हिच्या मनात येई
बसून खेळायला लागलो तर
ती म्हणायची "हा रांगणार कधी आता बाई"
रांगायला जेव्हा लागलो दुडूदुडू
तर "चाली -चाली "ची हिला झाली घाई
आता घरभर चालतो मी उद्योग करत
पण आता म्हणते ,"आधीचेच दिवस बरे होते बाई "
कधी काय सांगेल हे तिलाच कळत नाही
काय माहित अशी का अधूनमधून वागते आई ?
सकाळी बाथरूम च्या shower मध्ये
ही मला काही ओरडत नाही
[आंघोळीचा गरम पाण्याचा असतो ना ;) ]
पण देवबाप्पाच्या shower मध्ये [पाऊस]
मला अज्जिबात जाऊ देत नाही
मी कुठे उंचीवर चढू लागलो
तर असेल तिथून पळत येई
पण हिच्या खांद्यावर कोकरू असतो
तेव्हा हिला जरासुद्धा भीती वाटत नाही
कधी काय वागेल हे तिलाच कळत नाही
काय माहित अशी का अधूनमधून वागते आई ?
मी दुध भात खाल्ल्यावर तर
हिला भारीच आनंद होई
पण दिलेला खाऊ मी सांडू लागलो
तर रागाने का बघते आई ?
किती photoes काढते माझे,
पण तरीही तिचे मन भरत नाही
बाबांशी किती खेळलो तरी
मला आईशिवाय का करमत नाही
कधी काय वागेल हे तिलाच कळत नाही
पण काही झाले तरी मला खूप आवडते माझी आई !!
पण बाळाला असे काहीच मनात येत नसणार ....कारण त्याला कुठे एवढ काही कळत असतं? ते तर खूप निरागस आणि हसणारं पिल्लू असतं सगळ्याचं. पण जर त्याला सांगता आलं असतं तर त्याने असं सांगितलं असतं कदाचित....
कधी काय सांगेल हे तिचे तीलाच कळत नाही
काय माहीत अशी का अधूनमधून वागते आई
दुपटया मध्ये मी होतो तेव्हा
बसेन कधी असे हिच्या मनात येई
बसून खेळायला लागलो तर
ती म्हणायची "हा रांगणार कधी आता बाई"
रांगायला जेव्हा लागलो दुडूदुडू
तर "चाली -चाली "ची हिला झाली घाई
आता घरभर चालतो मी उद्योग करत
पण आता म्हणते ,"आधीचेच दिवस बरे होते बाई "
कधी काय सांगेल हे तिलाच कळत नाही
काय माहित अशी का अधूनमधून वागते आई ?
सकाळी बाथरूम च्या shower मध्ये
ही मला काही ओरडत नाही
[आंघोळीचा गरम पाण्याचा असतो ना ;) ]
पण देवबाप्पाच्या shower मध्ये [पाऊस]
मला अज्जिबात जाऊ देत नाही
मी कुठे उंचीवर चढू लागलो
तर असेल तिथून पळत येई
पण हिच्या खांद्यावर कोकरू असतो
तेव्हा हिला जरासुद्धा भीती वाटत नाही
कधी काय वागेल हे तिलाच कळत नाही
काय माहित अशी का अधूनमधून वागते आई ?
मी दुध भात खाल्ल्यावर तर
हिला भारीच आनंद होई
पण दिलेला खाऊ मी सांडू लागलो
तर रागाने का बघते आई ?
किती photoes काढते माझे,
पण तरीही तिचे मन भरत नाही
बाबांशी किती खेळलो तरी
मला आईशिवाय का करमत नाही
कधी काय वागेल हे तिलाच कळत नाही
पण काही झाले तरी मला खूप आवडते माझी आई !!

