आयुष्याची सुरुवात म्हणजे (पहाट)
पहाटेची झुळूक वाऱ्याची
निर्मळ,निरागस स्वच्छ मनाला
सोबत दुपट्ट्यापासून बाबागाडीची
पहिले पावूल,पहिले बोल
सारेच पहिले कौतुकाचे
आजीच्या मांडीवर,मामाच्या गाडीवर
सर्वांच्या अंगा-खांद्यावरून फिरायचे | | १ | |
पहाट असते खूपच लहान (सकाळ)
लवकरच मग सकाळ होते
शाळा, अभ्यास,मित्र,खेळ
बालपणाला सुरुवात होते
शरीर आणि मन घडायला
हीच नेमकी वेळ असते
स्तोत्र,स्पर्धा,छंद,शिबिरे
खेळlला तर सुट्टीच नसते
मित्रांशी भांडण,शेजाऱ्यांच्या तक्रारी
यांचा मुळी अभिमानच असतो
बाबांचा मार आणि आईचा आरडा-ओरडा
हा जसा काही प्रसादच असतो | | २ | |
बाहुला-बहुलींचा खेळ संपतो (दुपार)
आणि स्वप्नातल्या जगाशी ओळख होते
नाजूक कोवळ शोडष-वय म्हणजे
आयुष्यातल्या दुपारीची सुरुवात होते
स्वतःशीच बोलण,आरशात पाहण
रात्रभर जागण काही 'वेगळंच' असतं
पहिला प्रेम,पहिला सहवास
पहिल्या पावसाच मन बेभान असतं | | 3 | |
काही वर्षांनी शिक्षण संपल्यावर
कॉलेजच्या आठवणींची मनात गर्दी होते
स्वतःच्या ध्येयाची, स्वतःच्या वाटांची
ओळख तुम्हांला इथेच होते
आता नोकरीची सुरुवात,स्वावलंबी जीवन
मनाला थोडी शिथिलता आणते
आणखीन जबाबदारीची जाणीव व्हावी
म्हणून लग्नाची बेडी गळ्यात पडते !!! | | ४ | |
दुपार मुळी असतेच मोठी
काही केल्या संपत नाही
कर्तव्य आणि जबाबदारीतून
पाठ वरती निघत नाही
भर दुपारच्या उन्हाप्रमाणे आपण
संसारात तावून-सुलाखून निघतो
सुख-दुख , काळजी-समाधान
यांची बेरीज वजाबाकी करत राहतो | | ५ | |
बघता-बघता मध्यान्ह येते (संध्याकाळ)
संध्याकाळची घेवून चाहूल
घर-गाडी , मुलांचे शिक्षण संपून
मुलीच्या लग्नाचे माजते मनात काहूर
जबाबदार्या संपतात , काळजी मिटते
तिन्हीसांजेची वेळ होते,
सुख-दुखात साथ देणाऱ्या ग्रुहलक्ष्मिचि
सांज दिवा लावताना आठवण होते...! | | ६ | |
आकाशात संध्याकाळच्या रंग-छटा पाहताना
मनामध्ये आठवणी काहूर माजवतात
Retired मेंटचे सत्कार स्वीकारताना
डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात....
कुठे-पासून कुठे-पर्यंत आलो तो प्रवास (रात्र)
आठवतच पाय थोडेसे अडखळतात
म्हातारपण आल्याची जाणीव होवून
हात काठीचा आधार शोधू लागतात'
अंधुक नजर आणि एकाकीपण
म्हणजे आता रात्र आली
असेल तर सुखाचा नसेल तर संमिश्र'
दिवस संपण्याची वेळ झाली...... | | ७ | |
सौ प्राजक्ता पवार-पाटील
३/४/२०१३

Uttam Suo. Prajakta :) really nice... keep writing... :)
ReplyDeleteHey, Thank you Shilpa...
ReplyDeleteI liked your poems on Tingya...Superb....
Waiting to read more from you also...!
M just trying to write...thanks again.