( ती पुढच्याच आठवड्यात भावाच्या लग्नासाठी चांगले १५ दिवस निघाली आहे माहेरी...
Bag भरता भरता तिने 'अहो' ना मारलेले टोमणे कवितेच्या स्वरुपात....)
मोठ्या कौतूकान बघून घे
आता दिवस थोडेच राहिले
माझ्या हातच जेवून घे ||
माझ्या फालतू विषयांच्या गप्पा
'Timepass ' समजून ऐकून घे
आता दिवस थोडेच राहिले
एकदाच बोअर होवून घे ||
मी आवरताना आरशाच्या मध्ये मध्ये
मला अडथळा आणून घे
आता दिवस थोडेच राहिले
माझ्याशी पाहिजे तेवढ भांडून घे ||
कधी चीडचीड तर कधी लाड
गम्मत - मस्ती करून घे
आता दिवस थोडेच राहिले
हक्क अधिकार गाजवून घे ||
कधी आनंदान तर कधी दुखान
मिठीत माझ्या रडून घे
आता दिवस थोडेच राहिले
tension हलक करून घे ||
आता चेहरा पाडून बसू नकोस असा
आठवण आली तर न्यायला ये,
'तू तिथ मी' नेहमीच असेन
हे न सांगताच समजून घे ||

awesome... :) majja majja... :)
ReplyDeleteThank u Shilpa
Delete