श्रावण महिन्यात एका गुरुवारी ऑफिस मध्ये राधिकाने सर्व ladies staff ला "वरलक्ष्मि" पूजेच निमंत्रण दिले. Singapore ला शिफ्ट झाल्यानंतर मला बऱ्याच south - Indian मैत्रिणी झाल्या आहेत, त्यामुळेच त्यांच्या cultural गोष्टी पण जवळून पाहायला मिळत आहेत.
शुक्रवारी सगळ्याजणी ऑफिस मधुन एकत्र तिच्या घरी जायचे ठरले. माझ्यासाठी हे नवीन असल्यामुळे 'ही पूजा का असते' हे मी विचारलं. तर नवऱ्याला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावं आणि घराला सुख-समृद्धी मिळून लक्ष्मि ची कृपा कायम आपल्यावर राहावी हा या पूजेच्या मागचा उद्देश! म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं तर " वटपौर्णिमा + मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मि व्रत "
तिने निमंत्रणात हळदी-कुंकू सभारंभ चा उल्लेख पण केला होता. मला लहानपणी आजीच्या किंवा आईच्या मागून परकर-पोलकं घालून, नटून-थटून जाणारी मी आठवू लागले..... तेव्हाचा हळदी-कुंकू समारंभाचा अर्थ म्हणजे खूप साऱ्या काकूंना भेटण आणि मसाले दुध पिवून घरी येण इतकाच होता.
जस जसे मोठे होत जावू तसे अर्थ किती बदलत जातात याचा मी विचार करू लागले...आणि लग्नानंतर तर तो अर्थ समजायला लागतो असे वाटले. आणि न कळत गौराई घरात घेतानाचे शब्द आठवायला लागले...
.jpg)
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी?
हळदी-कुंकवाच्या पावलांनी
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी ?
हिरव्या चुड्याच्या पावलांनी
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी?
मंगळसूत्राच्या पावलांनी
ये ग गौराई

आले ग आई
कशाच्या पावलांनी
भाजी-भाकरीच्या पावलांनी
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
धन-धान्य आणि मांगल्याच्या पावलांनी
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
उदंड आयुष्य आणि चांगल्या आरोग्याच्या पावलांनी
ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
सुख-समृद्धी आणि शांतीच्या पावलांनी !!
दोन सेकंद विचार केल्यावर वाटले, गोष्टी जपल्या तर आहेत. आज तिच्या घरी असे वातावरण होते कि जराही वाटत नव्हते कि आपण परदेशात आहोत . एक खूप मस्त संध्याकाळ वाटली ,अगदी माहेरी हळदी कुंकवाला जावून आल्यासारखी...!