तमाम सचिन fan मधील एक सुदर्शन साठी ही कविता... हे त्याच्या मनातले माझ्या शब्दातून ...
लहानपणापासून आम्ही match ची वाट पाहायचो
क्रिकेट कसलं राव , सचिन ची batting च बघायचो
सचिनदादा ground वर आल्यावर नाद खुळा वाटायचं
one day असो कि test match शाळा चुकवून बसायचो
सचिनच्या cover drive ची style आम्ही bat शिवाय मारायचो
त्याचा बर्थडे मित्रांना बोलवून dolby लावून करायचो
Legend आमचा out झाल्यावर चिडून TV बंद करायचो
खरच, कोण होता तो आमचा कि त्याच्यावर इतक्या अपेक्षा लादायचो ?
९३ चा Hero-cup ,९८ चा sharjah
world cup २००३ काय world cup २०११
little master चा खेळ बघता बघता आम्ही मोठे होत गेलो
भावू मानून त्याला आम्ही inspire होत गेलो
परीक्षेत ATKT लागल्यावर तोंड पाडून बसायचो
पोस्टर बघून भावाच अभ्यासाला लागायचो
त्याच dedication ,त्याची discipline
स्वतः मध्ये आणायचा प्रयत्न करायचो
'न बोलता,कर्माने उत्तर द्यायची '
हे त्याच्या खेळामधून शिकायचो
देव pitch वर असल्यावर कॅन्टीनमधे गर्दी असे
college कट्टा ,गल्लीतील मंडळ सगळीकडेच सामसूम दिसे
मास्टर-ब्लास्टर खेळताना प्रत्येकजण जणू स्वतःला विसरत असे
सगळा भारत थांबवण्याची ताकद सचिनच्या batting मध्ये असे !
किती टीका झाल्या तरी तो फक्त खेळत राहिला
किती हेंल्थ प्रोब्लेम्स आले तरी तो त्यातून चालत राहिला
लहान-थोर सगळ्यांच्या अपेक्षा तो पेलत राहिला
रेकॉर्ड्स वर रेकॉर्ड्स तो संयमान उभारत गेला ....
पण ....आज मात्र नको असलेला black day आला आहे
tendlya चा शेवटचा कसोटी सामना आज वानखेडे वर होणार आहे :(
क्रिकेट आता संपलय आणि मन आहे खूप उदास आहे
राहून राहून सगळ इथेच थांबव असं खूप वाटत आहे :(
कसं सांगाव कि, 'सचिन , तू थांबू नकोस '
पण ...जे होणार ते होणारच आहे
किती रेकॉर्ड्स , किती समाजकार्य सांगेल तेवढ थोडं आहे
लिहिणाऱ्याचे शब्द संपतील इतका त्याचा थोरवा आहे !
हजारो चाहत्यांचे डोळे भरले जेव्हा तो आज मैदानावर आला
त्याची खेळी ,त्याची खुबी प्रत्येक क्षण आम्ही डोळ्यात साठवला
मस्त खेळला नेहमीसारखाच , ७४ वर हृदयाचा ठोका थांबला
त्याच्या खेळला Tribute म्हणून टिम ने जाताना Guard ऑफ honor दिला
माणूस मनानेच मोठा , कुणाचेही आभार मानायला नाही विसरला
डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले जेव्हा त्याने मैदानाला वाकून नमस्कार केला
सचिनचे नाव तोंडात नाही अशी एक व्यक्ती नाही
सचिन कुणाच्या घरात नाही असे एक घर नाही
सचिन एक पर्व आहे जे कधीच संपणार नाही
सचिनचा खेळ हि साठवण आहे ती डोळ्यातून जाणार नाही
किती आले किती येतील पण परत सचिन तेंडूलकर होणार नाही
खरंच! मला परत आता देवाला खेळताना बघायला मिळणार नाही :'( :'(

.jpg)




Mast... :)
ReplyDeleteagdi nemkya ani mojkya shabdat sagal kahi... :)