तहानभूक आणि झोप यांचं गणितच सगळ चुकलंय
एका चिमुकल्याने आता माझ जगच बदलून टाकलंय
तो उठतो तेव्हा माझ्या दिवसाची सुरुवात होते
त्याला भूक लागताच कामे तिथल्या तिथे थांबतात,
त्याच्याशी खेळायला आता पुन्हा मी लहान होते
बोबड्या बोलांनी आजकाल सारे घर भरून उठते,
आता समजू लागलीये आईपणाची जबाबदारी
कसावीच लागणार आहे त्याच्या मागून पळायला कंबर खरी
ठेवूच नये वाटते खाली ....सहज त्याला उचलून घ्यावे
त्याची छोटे बोटे धरून पऱ्यांच्या राज्यात जावे
चांदोबा, ससुल्या, मोर आता घरी येतात (आई च्या tab वर )
बाळ जेव्हा रडू लागतो, बाबा त्यांचीच मदत घेतात
तो फक्त हसला तरी दिवसभराचा क्षीण जातोय
तो खुश राहण्यासाठीच आम्ही कार्टून सारखे वागतोय :)
Laptop च्या समोर बसून आम्ही दुसऱ्या एका गावी जातो ....
तिथले हसरे चेहरे बघतो,मस्त आवाज -गाणी ऐकतो
आजी आजोबा मामा काका सगळे खुश होऊन जातात
बाळाच्या साऱ्या नखऱ्याच टाळ्या वाजवून कौतुक करतात
इतक्या सगळ्यांच्या लाडामध्ये एक पिल्लू मजेत येतोय
पिल्लू म्हणजे अखंड चैतन्य असाच मला भास होतोय
तहानभूक आणि झोप यांचं गणितच सगळ चुकलंय
एका चिमुकल्याने आता माझ जगच बदलून टाकलंय
10th July 2015


No comments:
Post a Comment