मागच्या आठवड्यात खूप पाऊस पडला आणि आमच्या बाल्कनीतून जे एक चिमण्यांचे घरटे दिसायचे ,ते त्यानंतर कुठे गायबच झाले.मग त्यानंतर मला जे वाटले या कवितेत मांडायचा प्रयत्न ...
कशी हरवली पाखरे आणि घरटे मोडत गेले
गोफ सुटली माळेची आणि मोती सांडत गेले ...ll

किलबिल किलबिल पिल्लांची ...सुंदर जाग येई
लगबगीने चिमणा चिमणी खाऊ शोधायला उडून जाई
इवल्याश्या ओठामधे छोटा छोटा घास
भरवण्याची चिमणी बाईची पद्धत होती खास
साऱ्यांचा सांभाळ करत चिमण्याचे किती पावसाळे निघून गेले
पण गोफ सुटली माळेची आणि मोती सांडत गेले ...1
पिल्लांच्या पंखात बळ आले शिक्षण झाले सुरु
उडण्यासाठी धडपड आता पिल्ले लागली करू
काही दिवस गेले आणि घेतली पिल्लांनी भरारी
चिमणी बाई दिवसभर काळजी करे बिचारी
सांजवेळी रोज घरट्याला यात्रेचे स्वरूप आले
पण गोफ सुटली माळेची आणि मोती सांडत गेले ... 2

घरी न सांगताच एकदा पिल्लांनी वेगळी योजना केली
नवीन वनामध्ये खेळताना त्यांना खूप मज्जा आली
अंधारून आले अचानक आणि वादळ झाले सुरु
आई बाबांची आठवण येवून डोळे लागले भरू
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये घरच उडून गेले :(
कशी हरवली पाखरे आणि घरटे मोडत गेले
गोफ सुटली माळेची आणि मोती सांडत गेले ...3

No comments:
Post a Comment