आई बाबा होताना एकमेकांकडे जरा दुर्लक्ष्य होते
आणि काही दिवस गेल्यावर हे त्याच्या लक्ष्यात येते
तो मारतो टोला तीला,
आजकाल तुला बाळाशिवाय काही सुचत नाही
काही सांगायचं म्हंटल तरी बाळाशिवाय तुझे विषय नाहीत
ऑफिसच्या गोष्टी, रुसवे फुगवे यांना तर मुळीच थारा नाही
तूच एकटी आई झालीस , जसा मी काही बाबा झालोच नाही :(
त्याच्या या बोलण्यावर काय बरे म्हणावे ,
आता वाटले तिला जर समजुतीनेच घ्यावे ...
अरे बाळ म्हणजे विश्वच आपले
तर विषय कुठले बोलू दुसरे ?
आता पिल्लूचे दिवस आले
तर कसले धरतोस रुसवे फुगवे ?
जबाबदारीच्या पायरीवर आलोय
हे आता समजून घेतलं पाहिजे
नवरा बायकोपेक्षा देखील
आता आई बाबा जमल पाहिजे ...
आई होण सोप्प आहे
पण आईपण येण कठीण असत ...
एकदा आई झाल्यानंतर
दुसऱ्या कोणत्याही नात्याला अंतरच पडत :)
लग्न आणि संसारापेक्षा
आई झाल्यावरच मुली खूप बदलतात
देवालाच माहित इतका समजूतदारपणा
बाळ झाल्यावर कुठून आणतात?
आणि काही दिवस गेल्यावर हे त्याच्या लक्ष्यात येते
तो मारतो टोला तीला,
आजकाल तुला बाळाशिवाय काही सुचत नाही
काही सांगायचं म्हंटल तरी बाळाशिवाय तुझे विषय नाहीत
ऑफिसच्या गोष्टी, रुसवे फुगवे यांना तर मुळीच थारा नाही
तूच एकटी आई झालीस , जसा मी काही बाबा झालोच नाही :(
त्याच्या या बोलण्यावर काय बरे म्हणावे ,
आता वाटले तिला जर समजुतीनेच घ्यावे ...
अरे बाळ म्हणजे विश्वच आपले
तर विषय कुठले बोलू दुसरे ?
आता पिल्लूचे दिवस आले
तर कसले धरतोस रुसवे फुगवे ?
जबाबदारीच्या पायरीवर आलोय
हे आता समजून घेतलं पाहिजे
नवरा बायकोपेक्षा देखील
आता आई बाबा जमल पाहिजे ...
आई होण सोप्प आहे
पण आईपण येण कठीण असत ...
एकदा आई झाल्यानंतर
दुसऱ्या कोणत्याही नात्याला अंतरच पडत :)
लग्न आणि संसारापेक्षा
आई झाल्यावरच मुली खूप बदलतात
देवालाच माहित इतका समजूतदारपणा
बाळ झाल्यावर कुठून आणतात?

No comments:
Post a Comment