Pages

Monday, 18 July 2016

बेटे भी तो...

माना की बेटीया कुछ खास होती हैं
पर बेटे भी तो अपनेपन का एहसास होते हैं



नन्हें नन्हें पैरोंसे घरको जगातें हैं
प्यारभरे आखोंसे दिलं को लुभाते हैं
मिठी मिठी बातोंसे मा को मनातें हैं
नटखट बाजी करने के लिये कन्हैयालाल बन जाते हैं
माना की बेट्टीयॉं जैसे नखरे नही कर पाते हैं
पर बेटे भी तो अपनेपन का एहसास होते हैं


मैदानमे खेल कम और झगडे ज्यादा करते हैं
पत्ता नही कहासे चोट लगवाकर आते हैं
स्कूलसे घर आनेपर कंमेंटरी सुनाते हैं
दोस्तोनके लिये तो ये कुछभी कर जाते हैं
माना की पढाईको sincerely नही लेते हैं
पर बेटे भी तो अपनेपन का एहसास होते हैं




College जानेपर डिमांड्स इनके बढ जाते हैं

Stylish और fashionable मॉडेलही बन जाते है
बहोत सारे ग्रुप्सके नेटवोर्क मे रहते हैं
सिक्रेट बाते तो बहेन-भाईको ही बोलते हैं
माना की बेट्टीयॉं जैसा सबकुछ नही बताते हैं
पर बेटे भी तो अपनेपन का एहसास होते हैं


बातोंसे से जतातें नहीं पर जीम्मेदारीयां उठते हैं
घरमे सभीको खुश रखनेकी हर कोशिश करते हैं
परेशानीया सहकर भी विश्वास को निभाते हैं
अपनोका एहसान कभी नही भुलते हैं
माना की बेटीयो जैसे अपना घर छोडके आते नही
पर दुसरे घरकी बेटीको दिलं मे रानीं बनाकर जीतें हैं





माँ के आंखोंका तारा तो बापकी शान होते हैं
बेहेना का गुरुर तो भाई का नाझ होते हैं
दोस्तोन्का राही तो बीवीका हमराही होते हैं
बच्चोनके लिये तो पापा घर का दुसरा नाम होते हैं
माना की बेटीयो जैसा प्यार नही जताते हैं
पर बेटे भी तो प्यार का भांडार होते हैं...

माना की बेटीया कुछ खास होती हैं
पर बेटे भी तो अपनेपन का एहसास होते हैं





Tuesday, 9 February 2016

काय माहीत अशी का अधूनमधून वागते आई ?

                     बाळ जन्माला आल्यापासून तो चालू लागेपर्यंत त्याच्यामध्ये खूप सहज आणि भरभर बदल होत जातात .बाळाला एक ते दीड वर्षाचे होताना पाहणे म्हणजे छोट्याश्या कळीचे हळूहळू फुलात नव्हे तर  फळात रुपांतर होताना पाहण्यासारखेच आहे!  पण हे दिवस आईला कधी भरभर जातील असे वाटते . आणि बाळाचे उद्योग सुरु झाल्यावर वाटते की आधीचेच दिवस बरे होते...!




                    पण बाळाला असे काहीच मनात येत नसणार ....कारण त्याला कुठे एवढ काही कळत असतं? ते तर खूप निरागस आणि हसणारं पिल्लू असतं सगळ्याचं. पण जर  त्याला सांगता आलं असतं तर त्याने असं सांगितलं असतं कदाचित....

कधी काय सांगेल हे तिचे तीलाच कळत नाही
काय माहीत अशी का अधूनमधून  वागते आई

दुपटया मध्ये मी होतो तेव्हा
बसेन कधी असे  हिच्या मनात  येई
बसून खेळायला  लागलो  तर
ती म्हणायची "हा रांगणार कधी आता  बाई"
रांगायला जेव्हा लागलो  दुडूदुडू
तर  "चाली -चाली "ची  हिला झाली  घाई
आता  घरभर चालतो मी उद्योग करत
पण  आता म्हणते ,"आधीचेच  दिवस बरे  होते  बाई "
कधी काय सांगेल  हे तिलाच  कळत नाही
काय माहित अशी  का अधूनमधून  वागते आई ?

सकाळी बाथरूम च्या  shower मध्ये
 ही मला  काही ओरडत  नाही
[आंघोळीचा गरम पाण्याचा असतो ना ;) ]
पण देवबाप्पाच्या shower मध्ये  [पाऊस]
 मला  अज्जिबात जाऊ देत नाही
मी कुठे  उंचीवर चढू लागलो
तर असेल तिथून पळत येई
पण हिच्या खांद्यावर कोकरू असतो
तेव्हा हिला जरासुद्धा भीती वाटत नाही
कधी काय वागेल हे तिलाच  कळत नाही
काय माहित अशी  का अधूनमधून  वागते आई ?

मी दुध भात खाल्ल्यावर  तर
हिला भारीच आनंद होई
पण दिलेला खाऊ मी सांडू  लागलो
तर रागाने का बघते आई ?
किती  photoes काढते माझे,
पण  तरीही  तिचे मन भरत  नाही
बाबांशी किती खेळलो तरी
मला आईशिवाय  का करमत नाही
कधी काय वागेल  हे तिलाच  कळत नाही
पण काही झाले तरी मला खूप आवडते माझी आई !!




Sunday, 31 January 2016

बदल

आई  बाबा  होताना  एकमेकांकडे जरा  दुर्लक्ष्य होते
आणि काही दिवस  गेल्यावर हे  त्याच्या लक्ष्यात  येते

तो मारतो टोला तीला,
आजकाल तुला बाळाशिवाय काही सुचत नाही
काही सांगायचं  म्हंटल  तरी  बाळाशिवाय  तुझे  विषय  नाहीत
ऑफिसच्या गोष्टी,  रुसवे फुगवे  यांना  तर  मुळीच  थारा  नाही
तूच  एकटी  आई झालीस , जसा मी काही  बाबा  झालोच  नाही  :(

त्याच्या या  बोलण्यावर  काय बरे  म्हणावे ,
आता वाटले  तिला  जर समजुतीनेच घ्यावे ...
अरे बाळ म्हणजे  विश्वच  आपले
तर  विषय  कुठले  बोलू दुसरे ?
आता पिल्लूचे  दिवस  आले
तर  कसले धरतोस रुसवे फुगवे ?
जबाबदारीच्या  पायरीवर  आलोय
हे आता समजून  घेतलं पाहिजे
नवरा बायकोपेक्षा  देखील
आता  आई बाबा जमल पाहिजे ...
आई  होण  सोप्प  आहे
पण आईपण  येण कठीण असत ...
एकदा  आई  झाल्यानंतर
दुसऱ्या कोणत्याही  नात्याला अंतरच पडत  :)
लग्न  आणि  संसारापेक्षा
आई झाल्यावरच मुली  खूप  बदलतात
देवालाच  माहित  इतका  समजूतदारपणा
बाळ झाल्यावर  कुठून आणतात?

Wednesday, 9 December 2015

श्रीमंती

" सर ,एक कप दुध मिलेगा क्या? "
६ महिने के बच्चे कि मां ने ३ स्टार हॉटेल मैनेजर  enquiry की...
मैनेजर बोला,"हां, 100 रुपये में मिलेगा "
"ठीक है,दे दो " , महिला ने कहा
जो पिकनिक के दौरान हॉटेल में ठहरी थी.
सुबह जब गाडी मे जा रहे थे तो बच्चे को फिर भूक लगी
गाडी को टूटी झोपडी वाली पुरांनी सी चाय कि दुकान पर रोका,
 बच्चे को दुध पिला दिया और शांत किया ....
दुध के पैसे पुछने पर बुढा दुकान मालिक बोला ,
"बेटी, हम बच्चेके दुध के पैसे नही लेते,यादी रास्ते मे चाहिये हो तो लेती जाना...."
बच्चे कि मां सोचती रह गई..."आमीर कौन है, ३ स्टार हॉटेल वाला या टूटी झोपडी वाला?"

                  परवाच वाचनात आलेला एक message.विचार करायला लावणारा आहे न? आणि मग मला हा msg वाचून काही दिवसापूर्वी घडलेली एक घटना आठवली. मनूच्या एका जवळच्या मैत्रिणीचे सुजाताचे  डोहाळे जेवण होते . तीच अगत्याच आमंत्रण होत, पण मनूच्या  घरी नेमक्या त्याच दिवशी कार्यक्रम असल्याने तिला जाता आले नाही. मग त्याच्या पुढच्या आठवड्यात ती  वेळ काढून तिच्या आवडीच्या  आईने बनवलेल्या खोबऱ्याच्या वड्या आणि गव्हाची   खीर घेवून तिला भेटायला गेली .तिला खूप  आनंद झाला.
                  बऱ्याच वेळ गप्पा मारल्या,zokes  झाले...बोलता बोलता आणखी एका मैत्रिणीचा विषय निघाला आणि सुजाताचा चेहरा पडला .मनुला  ती गोष्ट लक्षात आली .तिने सुजाला विचारले,"काही झाले आहे का दोघींमध्ये?तुझा चेहरा का पडला?"
यावर  ती पहिल्यांदा गप्प राहिली . मग उठून कपाटातली एक साडी तिने काढून दाखवली ....साडी तशी छान होती...मग ती म्हणाली  , " माझ्या डोहाळे जेवणाला कुसुमने ही साडी दिली आहे,पण हा पहा...साडीला पिको-फोल आहे...म्हणजे ही साडी वापरलेली आहे."
मनुने थोडे निरखून पहिले,तर खरच साडी वापरल्यासारखी  वाटत होती...पण तिला पटेना कि अशी वापरलेली साडी आपली मैत्रीण देवू शकते ...तिने सुजाताला विचारले "पण तू खात्री केली आहेस का नक्की? कि हीच साडी तिने दिली म्हणून?"
"आग हो, हीच दिली होती...कारण माझ्या शेजारी मावशी आहेरांची लिस्ट करत होती...नंतर गोंधळ नको म्हणून आईने सांगितलं होत तीला..." आणि सुजाता गप्प झाली. मग म्हणाली , " कदाचित घाईघाई मध्ये चुकून दुसरी साडी आली असेल असे वाटले मला ...पण काय माहित बुवा ? तिला नेहमी प्रमाणे दुसऱ्यांना कमी लेखायचे असेल तरीही दिली असेल तिने ही साडी. "
                  आणि मग मनुला काय बोलावे हेच सुचेना !  कुसुम उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली शेंडेफळ...दिसायला सुंदर ...वागण्यात,बोलण्यात मस्त ...घर गृह्स्थीमध्ये उत्तम . चार चौघींमध्ये उठून दिसेल अशी तरुणी .... Graduation झाल्यावर १-२ वर्षांत लग्नाचा विषय सुरु झाला.आणि सर्वांच्या अपेक्षेच्या पलीकडे खूप छान स्थळ तीला मिळाल. मुलगा सुशिक्षित,आर्थिक परिस्तिथी उत्तम,समाजात  खूप चांगले नाव असलेल्या  श्रीमंत घरामध्ये तिचे लग्न ठरले.सगळ्यांना खूप आनंद झाला.
लग्न छान पार पडलं...आणि कुसुम बदलली.तिच्या बोलण्यात सगळ्या मोठ्या गोष्टींचा उल्लेख  येऊ लागला.तिला मोठेपणाच्या नादामध्ये हे समजेना झाल की आपण समोरच्या व्यक्तीला नकळत दुखावत किंवा कमी लेखत आहे. आणि मग हळूहळू ती सर्वांच्या मनातून उतरू लागली...तरी एक मैत्रीण म्हणून साऱ्याजणी तिच्याशी संपर्क ठेवून होत्या. पण तिच्या माघारी सगळ्या तिला नावें ठेवू लागल्या.
                   त्यात ही असली घटना घडल्यावर तर मनुला आणखीनच वाईट वाटल. कदाचित काहीतरी गफलत घडली असेलही...पण या गोष्टीवर जर सुजाताच्या दृष्टीने  विचार केला तर वाटत, की कुसुमचे so called status , श्रीमंती आणि बरंच जे काही आहे,ते काय कामाचं ? जिथे मैत्रीण कमीपणा दाखवायचा प्रयत्न करते,अशी मैत्री काय कामाची? जिथे माणूसकी किंवा भावना काडीमोल आहेत,अशा श्रीमंती पेक्षा वरच्या message मधला टपरीवाला जास्त श्रीमंत नाही का?
आणि मग मला एक status आठवला ,"When god blesses you financially, dont raise your standard of living but raise your standards of Giving!!! "


Tuesday, 1 December 2015

ओढ



पडणाऱ्या प्रत्येक पावलाला
आत्मविश्वासाची जोड असावी
अंधारात चालतानाही
प्रकाशाची ओढ असावी...

१६/९/२००२



क्षितीज

शोधता शोधता इंद्रधनुष्य
मी सप्तरंग बनत गेले
आकाशाचा ध्यास होता
तुझ्यात क्षितीज मिळत गेले

१५/११/२०१०










शब्द

माझी आजी आणि आजोबा माझे lifetime बेस्ट friends आहेत, त्यांनी मला ज्या त्या वेळी दिलेले सल्ले मला आजही आठवतात...असाच एक महत्वाचा सल्ला मी खालच्या कवितेत आणि त्यांच्याच भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे.

थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

शब्दांची  फुले कुणाच्या  मनाला  सुखावतील
शब्दांचे  हार  कौतुकाच्या  शिखरावर  चढवतील
शब्दांनी बसतील  कुणाला खूप  खोलवर  घाव
शब्दच  व्यक्त  करतात  मनात लपलेला भाव
असेच काहीतरी  बोलून करू  नकोस  शब्दाने  अनादर
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

शब्दच  लोकांना  जोडतात ,शब्दच  लोकांना  तोडतात ...
तलवारीच्या  नसेल पण  शब्दांच्या जखम  चिघळतात
रक्ताची  नाती सुद्धा  शब्दाने  खूप  दूर  जातात
खूप सुंदर  आठवणी  मग  धुक्याप्रमाणे  विरून  जातात
एकदा  गेलेला  शब्द कधीच  परत  घेत  नाही  येणार
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

जरी असेल कुणाचा उद्वेग तरी मन  ठेव शांत
मग शब्द नाही  करायला लावणार  उगीच कसली भ्रांत
जेव्हा होईल कौतुक तेव्हा जमिनीवर रहा
आयुष्यातले परिश्रमाचे दिवस आठवून पहा
बोलताना कर तू दहा वेळा विचार
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर