सगळ काही मांडता येईल अशी हक्काची जागा असते
चांगला मार्ग दाखवून जाईल असा एक वाटसरू असते
बालवयात अल्लड तर तरुणपणात खेळकर होते
तुमच्यातल परिवर्तन जगणारी तुमचीच एक छबी होते
खरंच,मैत्री म्हणजे रक्ताच्या नात्याच्याही पलीकडे असते....!
विश्वासाच्या पायावर भक्कमपणे उभी असते
एकमेकांबरोबर सुंदर भावबंध गुंफत जाते
कठीण प्रसंगी जगण्यासाठी आधार देवून जाते
दिवसरात्र मनात आठवणी जागवत राहते
खरंच, मैत्री म्हणजे जुन्या वहीत जपलेलं मोरपीस असते ....!
गरज असताना एकटेपणात सोबत करते
दुखाच्या प्रसंगी सावली सारखी पाठीशी राहते
चुकलात तर हक्काने समजावून सांगते
जिंकलात तर अभिमानान मिरवून सांगते
खरंच, मैत्री म्हणजे अळवाच्या पानावरचा मोती असते ....!
जवळ असताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असते
अंतर असताना कधी-कधी पापण्यांच्या थेंबावर असते
नदीसारखी निर्मळ,पावसासारखी बेभान असते
इंद्रधनुच्या रंगांप्रमाणे क्षितीज्याच्याही पलीकडे असते
खरच, मैत्री म्हणजे न संपणारी ओढ असते ....!



मैत्री असते हात आणि डोळ्यासारखी…
ReplyDeleteहाताला लागलं तर डोळ्यातून पाणी येतं…
आणि डोळ्यातलं पाणी पुसायला हातच पुढे सरसावतात… :)
Mast ahe Kavita.. :)