ज्या गोष्टी मी या कवितेतून मांडायचा प्रयत्न केला आहे, त्या कधी न कधी प्रत्येकाला एकदातरी मनातून वाटल्याच असतील . Specially , जेव्हा तुमच्या Parents ना तुमची गरज असते आणि तुम्हाला मनात असूनदेखील वेळ देता येत नाही.....:(
स्वतः च्या routine मधेच गुंतत राहिलो आम्ही
घरातल्या आई-बाबांकडे लक्षच नाही राहिले
बदलले वय आणि प्रसंग सुद्धा बदलून गेले
पांढरे झालेले केस त्यांचे आजच नव्याने जाणवले
सुरकुत्याना सुरुवात होवून डोळे देखील आत गेलेले
म्हातारपण येतंय त्यांचे हे पहिल्यांदाच जाणवून गेले
स्वार्थी होतात ना मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले :'(
आमचे लहानपण,खेळ आणि कौतुक
त्यांनीही आमच्याबरोबर Enjoy केले
शाळा आणि परीक्षांच्या tension मध्ये
तरुणपण त्यांचे निसटून गेले
आमच्या बेफिकीर मागण्यांसाठी
त्यांनी न पेलणारे खर्च अंगावर घेतले
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले ...
" चांगला शिक आणि मोठा हो... "
एवढीच अपेक्षा ते करत राहिले
भरलेल्या आनंदाच्या ओंजळी
आमच्या हातात रिकाम्या करत गेले
स्वतःचे time - table नव्हतेच त्यांना
जग त्यांचे आमच्याभोवतीच फिरत राहिले
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले...
आम्ही मोठे झाल्यावर उडून गेलो
ते तिथल्या घरट्यात इकटेच राहिले
त्यांचे दवाखाने, उतारवय आणि प्रॉब्लेम्स
ते न सांगताच निपटत राहिले
कितीतरी गोष्टींच्या आठवणी जपत
आमच्या सुखासाठी देवापुढे प्रार्थना करत राहिले
आणि एक कुठेतरी संपणारा प्रवास
शेवटी एकट्यानेच चालत राहिले....!
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले :'(


Next poem kadhi dear?? :) waiting for the next one... :)
ReplyDeleteLihite lawkarach...😊 thank you dear
ReplyDelete