Pages

Wednesday, 9 December 2015

श्रीमंती

" सर ,एक कप दुध मिलेगा क्या? "
६ महिने के बच्चे कि मां ने ३ स्टार हॉटेल मैनेजर  enquiry की...
मैनेजर बोला,"हां, 100 रुपये में मिलेगा "
"ठीक है,दे दो " , महिला ने कहा
जो पिकनिक के दौरान हॉटेल में ठहरी थी.
सुबह जब गाडी मे जा रहे थे तो बच्चे को फिर भूक लगी
गाडी को टूटी झोपडी वाली पुरांनी सी चाय कि दुकान पर रोका,
 बच्चे को दुध पिला दिया और शांत किया ....
दुध के पैसे पुछने पर बुढा दुकान मालिक बोला ,
"बेटी, हम बच्चेके दुध के पैसे नही लेते,यादी रास्ते मे चाहिये हो तो लेती जाना...."
बच्चे कि मां सोचती रह गई..."आमीर कौन है, ३ स्टार हॉटेल वाला या टूटी झोपडी वाला?"

                  परवाच वाचनात आलेला एक message.विचार करायला लावणारा आहे न? आणि मग मला हा msg वाचून काही दिवसापूर्वी घडलेली एक घटना आठवली. मनूच्या एका जवळच्या मैत्रिणीचे सुजाताचे  डोहाळे जेवण होते . तीच अगत्याच आमंत्रण होत, पण मनूच्या  घरी नेमक्या त्याच दिवशी कार्यक्रम असल्याने तिला जाता आले नाही. मग त्याच्या पुढच्या आठवड्यात ती  वेळ काढून तिच्या आवडीच्या  आईने बनवलेल्या खोबऱ्याच्या वड्या आणि गव्हाची   खीर घेवून तिला भेटायला गेली .तिला खूप  आनंद झाला.
                  बऱ्याच वेळ गप्पा मारल्या,zokes  झाले...बोलता बोलता आणखी एका मैत्रिणीचा विषय निघाला आणि सुजाताचा चेहरा पडला .मनुला  ती गोष्ट लक्षात आली .तिने सुजाला विचारले,"काही झाले आहे का दोघींमध्ये?तुझा चेहरा का पडला?"
यावर  ती पहिल्यांदा गप्प राहिली . मग उठून कपाटातली एक साडी तिने काढून दाखवली ....साडी तशी छान होती...मग ती म्हणाली  , " माझ्या डोहाळे जेवणाला कुसुमने ही साडी दिली आहे,पण हा पहा...साडीला पिको-फोल आहे...म्हणजे ही साडी वापरलेली आहे."
मनुने थोडे निरखून पहिले,तर खरच साडी वापरल्यासारखी  वाटत होती...पण तिला पटेना कि अशी वापरलेली साडी आपली मैत्रीण देवू शकते ...तिने सुजाताला विचारले "पण तू खात्री केली आहेस का नक्की? कि हीच साडी तिने दिली म्हणून?"
"आग हो, हीच दिली होती...कारण माझ्या शेजारी मावशी आहेरांची लिस्ट करत होती...नंतर गोंधळ नको म्हणून आईने सांगितलं होत तीला..." आणि सुजाता गप्प झाली. मग म्हणाली , " कदाचित घाईघाई मध्ये चुकून दुसरी साडी आली असेल असे वाटले मला ...पण काय माहित बुवा ? तिला नेहमी प्रमाणे दुसऱ्यांना कमी लेखायचे असेल तरीही दिली असेल तिने ही साडी. "
                  आणि मग मनुला काय बोलावे हेच सुचेना !  कुसुम उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली शेंडेफळ...दिसायला सुंदर ...वागण्यात,बोलण्यात मस्त ...घर गृह्स्थीमध्ये उत्तम . चार चौघींमध्ये उठून दिसेल अशी तरुणी .... Graduation झाल्यावर १-२ वर्षांत लग्नाचा विषय सुरु झाला.आणि सर्वांच्या अपेक्षेच्या पलीकडे खूप छान स्थळ तीला मिळाल. मुलगा सुशिक्षित,आर्थिक परिस्तिथी उत्तम,समाजात  खूप चांगले नाव असलेल्या  श्रीमंत घरामध्ये तिचे लग्न ठरले.सगळ्यांना खूप आनंद झाला.
लग्न छान पार पडलं...आणि कुसुम बदलली.तिच्या बोलण्यात सगळ्या मोठ्या गोष्टींचा उल्लेख  येऊ लागला.तिला मोठेपणाच्या नादामध्ये हे समजेना झाल की आपण समोरच्या व्यक्तीला नकळत दुखावत किंवा कमी लेखत आहे. आणि मग हळूहळू ती सर्वांच्या मनातून उतरू लागली...तरी एक मैत्रीण म्हणून साऱ्याजणी तिच्याशी संपर्क ठेवून होत्या. पण तिच्या माघारी सगळ्या तिला नावें ठेवू लागल्या.
                   त्यात ही असली घटना घडल्यावर तर मनुला आणखीनच वाईट वाटल. कदाचित काहीतरी गफलत घडली असेलही...पण या गोष्टीवर जर सुजाताच्या दृष्टीने  विचार केला तर वाटत, की कुसुमचे so called status , श्रीमंती आणि बरंच जे काही आहे,ते काय कामाचं ? जिथे मैत्रीण कमीपणा दाखवायचा प्रयत्न करते,अशी मैत्री काय कामाची? जिथे माणूसकी किंवा भावना काडीमोल आहेत,अशा श्रीमंती पेक्षा वरच्या message मधला टपरीवाला जास्त श्रीमंत नाही का?
आणि मग मला एक status आठवला ,"When god blesses you financially, dont raise your standard of living but raise your standards of Giving!!! "


Tuesday, 1 December 2015

ओढ



पडणाऱ्या प्रत्येक पावलाला
आत्मविश्वासाची जोड असावी
अंधारात चालतानाही
प्रकाशाची ओढ असावी...

१६/९/२००२



क्षितीज

शोधता शोधता इंद्रधनुष्य
मी सप्तरंग बनत गेले
आकाशाचा ध्यास होता
तुझ्यात क्षितीज मिळत गेले

१५/११/२०१०










शब्द

माझी आजी आणि आजोबा माझे lifetime बेस्ट friends आहेत, त्यांनी मला ज्या त्या वेळी दिलेले सल्ले मला आजही आठवतात...असाच एक महत्वाचा सल्ला मी खालच्या कवितेत आणि त्यांच्याच भाषेत मांडायचा प्रयत्न केला आहे.

थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

शब्दांची  फुले कुणाच्या  मनाला  सुखावतील
शब्दांचे  हार  कौतुकाच्या  शिखरावर  चढवतील
शब्दांनी बसतील  कुणाला खूप  खोलवर  घाव
शब्दच  व्यक्त  करतात  मनात लपलेला भाव
असेच काहीतरी  बोलून करू  नकोस  शब्दाने  अनादर
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

शब्दच  लोकांना  जोडतात ,शब्दच  लोकांना  तोडतात ...
तलवारीच्या  नसेल पण  शब्दांच्या जखम  चिघळतात
रक्ताची  नाती सुद्धा  शब्दाने  खूप  दूर  जातात
खूप सुंदर  आठवणी  मग  धुक्याप्रमाणे  विरून  जातात
एकदा  गेलेला  शब्द कधीच  परत  घेत  नाही  येणार
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

जरी असेल कुणाचा उद्वेग तरी मन  ठेव शांत
मग शब्द नाही  करायला लावणार  उगीच कसली भ्रांत
जेव्हा होईल कौतुक तेव्हा जमिनीवर रहा
आयुष्यातले परिश्रमाचे दिवस आठवून पहा
बोलताना कर तू दहा वेळा विचार
थोडे  जपून  शब्द  वापर  बाळा ,जपून  शब्द  वापर

Monday, 30 November 2015

कशी हरवली पाखरे

मागच्या आठवड्यात खूप पाऊस पडला आणि आमच्या बाल्कनीतून जे एक चिमण्यांचे घरटे दिसायचे ,ते त्यानंतर कुठे गायबच झाले.मग त्यानंतर मला  जे वाटले या कवितेत मांडायचा प्रयत्न ...


कशी हरवली पाखरे  आणि घरटे  मोडत गेले
गोफ  सुटली माळेची  आणि  मोती  सांडत  गेले ...ll



किलबिल किलबिल पिल्लांची ...सुंदर जाग येई
लगबगीने चिमणा चिमणी खाऊ शोधायला उडून जाई
इवल्याश्या ओठामधे छोटा छोटा  घास
भरवण्याची चिमणी बाईची पद्धत होती खास
साऱ्यांचा सांभाळ करत चिमण्याचे किती पावसाळे निघून गेले
पण गोफ  सुटली माळेची  आणि  मोती  सांडत  गेले ...1






















पिल्लांच्या पंखात बळ आले शिक्षण झाले सुरु
उडण्यासाठी धडपड आता पिल्ले लागली करू
काही दिवस गेले आणि घेतली पिल्लांनी भरारी
चिमणी बाई दिवसभर काळजी करे बिचारी
सांजवेळी रोज घरट्याला यात्रेचे स्वरूप आले
पण गोफ  सुटली माळेची  आणि  मोती  सांडत  गेले ... 2



घरी न  सांगताच एकदा पिल्लांनी वेगळी योजना केली
नवीन  वनामध्ये  खेळताना त्यांना खूप मज्जा आली
अंधारून आले अचानक आणि  वादळ  झाले सुरु
आई बाबांची आठवण येवून  डोळे  लागले भरू
सोसाट्याच्या  वाऱ्यामध्ये घरच उडून  गेले   :(
कशी हरवली पाखरे  आणि घरटे  मोडत गेले
गोफ  सुटली माळेची  आणि  मोती  सांडत  गेले ...3

Saturday, 28 November 2015

कारण

त्याच्या चिडचिडेपनाच कारण
तिला समजून घेता येत नाही
तो तरी करतो कुणासाठी इतक सार
हेच तिला कळत नाही...:(

देवाचे देण - घेण

देवाने  देताना  इतकंही  देवू  नये ,
की  दिलेल्या  गोष्टींची किंमतच राहणार  नाही ...
देवाने  घेताना असंही  काढून  घेवू  नये ,
की  जगण्यासाठी  नंतर  हिंम्मतच  राहणार  नाही...

हाक

भरगच्च चांदण्यांच्या  आकाशात  एक  चांदणी माझी  असावी
नदीकाठी बसलेल्या संध्याकाळी  एक  वाऱ्याची झुळूक माझी असावी
कधी  जेव्हा वाटेल आता नको  झालंय देवा सगळ
तेव्हा  "मी आहे न  "अस  म्हणणारी एक  हाक  तुझी असावी 

Thursday, 10 September 2015

Being Mother





Knowingly or unknowingly babies teaches so many things to his/her mother. Baby's arrival at home makes so many changes in the family....from living room set up to priorities of work. Sadness, guilt, anger , negative feelings are easily coverted to happiness or mother start to ingnore it. Because existance of baby arround makes her life more beautiful and more meaningful.
She starts obesrving baby's behaviour like; to be happy without no reason, smiling to a strange person at lift, to try continously to reach at something , to forget and forgive a person who was bad to her/him...and so on.
Spending time with baby, she starts living her own childhood again...by comparing few things with past...And then she tries to give her best to her little bundle of joy !!
Thus, Being Mother every mom will realise few things by her own...



Being mother made me surprise how nicely one can smile without any reason
Being mother made me change myself from fairy girl to responcible person !

Being mother made me  understand language of little eyes n cries
Being mother made me realize another copy of me is growing in front of my eyes!

Being mother made me analyse whatever  I am  doing right or wrong
Being mother made me sing cute peoms and lovely songs!!

Being mother made me tell how stories can be bound with little things
Being mother made me keep restless stamina to be all the time

Being mother made me define how world could be seen as a small wonder
Being mother made me understand learning never stops at all

Being mother made me feel that one life is resting without any fear in my arms
Being mother made me realize happiness is nothing but  bluffy kisses by ur charm!!

Being mother made me deeply feel how much mother does for her kids!
Being mother made me feel unconditional love  for my little one inside!!


Tuesday, 1 September 2015

बदललेलं जग







तहानभूक आणि झोप यांचं गणितच सगळ चुकलंय
एका चिमुकल्याने आता माझ जगच बदलून टाकलंय

तो उठतो तेव्हा माझ्या दिवसाची सुरुवात होते
त्याला भूक लागताच कामे तिथल्या तिथे थांबतात,
त्याच्याशी खेळायला आता पुन्हा मी लहान होते
बोबड्या बोलांनी आजकाल सारे घर भरून उठते,
आता समजू लागलीये आईपणाची जबाबदारी
कसावीच लागणार आहे त्याच्या  मागून पळायला कंबर खरी

ठेवूच नये वाटते खाली ....सहज त्याला उचलून घ्यावे
त्याची छोटे बोटे धरून पऱ्यांच्या राज्यात जावे
चांदोबा, ससुल्या, मोर आता घरी येतात (आई च्या tab वर )
बाळ जेव्हा रडू लागतो, बाबा त्यांचीच मदत घेतात
तो फक्त हसला तरी दिवसभराचा क्षीण जातोय
तो  खुश राहण्यासाठीच आम्ही कार्टून सारखे वागतोय  :)

Laptop च्या समोर बसून आम्ही दुसऱ्या एका गावी जातो ....
तिथले हसरे चेहरे बघतो,मस्त आवाज -गाणी ऐकतो
आजी आजोबा मामा काका सगळे खुश होऊन जातात
बाळाच्या साऱ्या नखऱ्याच टाळ्या वाजवून कौतुक करतात
इतक्या सगळ्यांच्या लाडामध्ये एक पिल्लू मजेत येतोय
पिल्लू म्हणजे अखंड चैतन्य असाच मला भास होतोय

तहानभूक आणि झोप यांचं गणितच सगळ चुकलंय
एका चिमुकल्याने आता माझ जगच बदलून टाकलंय

10th July 2015


Wednesday, 22 April 2015

दक्ष



चिमुकले डोळे आणि चिमुकले पाय
आमच्या दक्ष बाळाशी खेळायला येताय काय?

छोट्या छोट्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघतो
जे काही हव नाही ते रडण्यातूनच सांगतो

इवल्याश्या शरीराचे इवलेसे ओझे
घरात वाटे प्रत्येकाला बाळ आहे माझे



मालिश ,आंघोळ ,धूप , स्वच्छता बाळाची बडदास्त भारी
लेक आणि नातवाचे कौतुक-लाड करून  दमून जाई आजी बिचारी...

बाळ म्हणजे जग झालाय बाळ म्हणजे श्वास ,
पणजीपासून आज्जीपर्यंत सर्वाना बाळाचाच ध्यास !

दिवसापासून रात्रीपर्यंत वेळ जातो कुठे समजत  नाही
बाळ मात्र पाळण्यामधून शांतपणे मज्जा पाही





बाळाची दुपटी ,कपडे ,खेळणी उचलत दिवस सगळा संपून जाई
सुख म्हणजे बाळ लीला पाहण सांगेल कशी शब्दांतून आई ?

बाळ जन्माला येवून घराचे गोकुळ करून टाकते ,
खरच ,किती उपकार ते  आईपण देवून स्त्रीवर करते ... !