पाऊस आणतो बेभान वारा
पाऊस आणतो कोसळणाऱ्या धारा
पाऊस चिंब ओल्या मनाचा थाट
पाऊस म्हणजे विजांचा कडकडाट
पाऊस येतो घेवून हिरवे रान
पाऊस होतो पक्षांची तान
पाऊस म्हणजे ओला सुवास मातीचा
पाऊस म्हणजे कायापालट निसर्गाचा..!

पाऊस लहानांसाठी होडी होतो
पाऊस तरुण मनाची गोडी होतो
असा हा पाऊस तन -मनाला डोलवतो,
असा हा पाऊस सर्वांनाच वेड लावतो...!
पाऊस होतो शेतकऱ्याला संजीवनी
पाऊस आणतो फुला-झाडांना पालवी
पाऊस झाडतो मनाची मरगळ
पावूस देवून जातो आनंद निरंतर...!
पाऊस आणतो कोसळणाऱ्या धारा
पाऊस चिंब ओल्या मनाचा थाट
पाऊस म्हणजे विजांचा कडकडाट
पाऊस येतो घेवून हिरवे रानपाऊस होतो पक्षांची तान
पाऊस म्हणजे ओला सुवास मातीचा
पाऊस म्हणजे कायापालट निसर्गाचा..!

पाऊस लहानांसाठी होडी होतो
पाऊस तरुण मनाची गोडी होतो
असा हा पाऊस तन -मनाला डोलवतो,
असा हा पाऊस सर्वांनाच वेड लावतो...!
पाऊस होतो शेतकऱ्याला संजीवनी
पाऊस आणतो फुला-झाडांना पालवी
पाऊस झाडतो मनाची मरगळ
पावूस देवून जातो आनंद निरंतर...!


No comments:
Post a Comment