Pages

Tuesday, 31 December 2013

आठवणींचा कप्पा






                  आज  बऱ्याच दिवसांनी एका खूप जवळच्या मैत्रिणीला phone  केला . आधी formal  संभाषण सुरु  झाल  आणि मग हळूहळू दोघींनी  पण cassete  टाकली . अगदी  शाळेपासूनच्या  गोष्टी आठवत आठवत  मग  अगदी  संसारा पर्यंतच्या गप्पा मारल्या . मनसोक्त हसलो ,एकमेकीना सल्ले दिले,अगदी वय विसरून  चेष्टा  मस्करी  पण  केली  कुणाकुणाची...खूप मस्त वाटल...मग  शेवटी phone ठेवायला  नकोच  वाटायला लागला.    पण काय  करणार?  वेळेच भान   ठेवायलाच पाहिजे  न ?
                  phone ठेवल्यावर मात्र खूप एकट वाटायला  लागल बराच  वेळ ...मी विचारात पडले, प्रत्येकाला  एखादी  तरी  जागा  हवी  मन  हलक  करायला ... अशी  एखादी व्यक्ती किंवा मैत्रीण हवी आयुष्यात  कि  जिच्याशी  आपण  आपला  मुखवटा न वापरता  बोलू शकू, मनातल्या  सगळ्या  गोष्टी सांगू शकू , अगदी  मोठेपणाच्या  सगळे  अंतर  तोडून ...!  सरत्या  वर्षाचा निरोप घेता घेता आज  एका गोष्टीचा  शोध  लागला ...


एखादी  तरी  व्यक्ती  हवी  आयुष्यात
तुमचे  बंध  जिथे  सहजच  जुळावेत  ,
कधी  वाटेल  आता  उघडावं  अंतरंग
ते  न  सांगता तिच्या  ओठून  पडावे ...


Wednesday, 27 November 2013

क्रिकेटचा देव आज retired झाला...१५ नोव्हेंबर २०१३, black day !!

तमाम सचिन fan  मधील एक सुदर्शन साठी ही कविता... हे त्याच्या मनातले माझ्या शब्दातून ...




  लहानपणापासून आम्ही match ची वाट  पाहायचो
क्रिकेट कसलं राव , सचिन ची batting  च बघायचो
सचिनदादा  ground वर आल्यावर नाद खुळा वाटायचं 
one  day  असो कि test  match शाळा  चुकवून बसायचो
सचिनच्या cover drive ची style आम्ही bat  शिवाय  मारायचो
त्याचा बर्थडे मित्रांना बोलवून dolby  लावून  करायचो 
Legend आमचा out  झाल्यावर चिडून TV बंद करायचो
खरच, कोण होता तो आमचा  कि त्याच्यावर इतक्या अपेक्षा लादायचो ?




 ९३ चा Hero-cup ,९८ चा sharjah 
world  cup  २००३  काय world cup २०११  
little  master  चा  खेळ बघता बघता आम्ही मोठे होत गेलो
भावू  मानून त्याला आम्ही inspire होत गेलो
परीक्षेत ATKT लागल्यावर तोंड पाडून बसायचो
पोस्टर बघून भावाच अभ्यासाला लागायचो
त्याच dedication ,त्याची discipline 
स्वतः मध्ये आणायचा  प्रयत्न करायचो
'न बोलता,कर्माने उत्तर द्यायची '   
हे त्याच्या खेळामधून  शिकायचो




देव pitch  वर असल्यावर कॅन्टीनमधे गर्दी असे
college  कट्टा ,गल्लीतील मंडळ सगळीकडेच सामसूम दिसे
मास्टर-ब्लास्टर  खेळताना प्रत्येकजण जणू स्वतःला विसरत असे
सगळा भारत  थांबवण्याची ताकद सचिनच्या  batting  मध्ये  असे !
किती टीका झाल्या तरी तो फक्त खेळत राहिला
किती हेंल्थ प्रोब्लेम्स आले तरी तो त्यातून चालत राहिला
लहान-थोर सगळ्यांच्या अपेक्षा तो पेलत राहिला
रेकॉर्ड्स वर रेकॉर्ड्स तो संयमान उभारत गेला ....




पण ....आज मात्र  नको असलेला black  day  आला आहे
tendlya चा शेवटचा कसोटी सामना आज वानखेडे वर होणार आहे :(
क्रिकेट आता संपलय आणि मन आहे खूप उदास आहे
राहून राहून सगळ इथेच थांबव असं खूप वाटत आहे :(
कसं सांगाव कि,  'सचिन , तू थांबू नकोस  ' 
पण ...जे होणार ते होणारच  आहे
किती रेकॉर्ड्स , किती समाजकार्य सांगेल तेवढ थोडं आहे
लिहिणाऱ्याचे शब्द संपतील इतका त्याचा थोरवा आहे  !



हजारो चाहत्यांचे डोळे भरले जेव्हा तो आज  मैदानावर आला
त्याची खेळी ,त्याची खुबी प्रत्येक क्षण आम्ही डोळ्यात साठवला 
मस्त खेळला नेहमीसारखाच , ७४ वर हृदयाचा ठोका थांबला 
त्याच्या खेळला Tribute  म्हणून टिम ने जाताना Guard  ऑफ honor  दिला 
माणूस मनानेच मोठा , कुणाचेही आभार मानायला नाही विसरला 
डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले जेव्हा त्याने मैदानाला वाकून नमस्कार केला






सचिनचे नाव तोंडात नाही अशी एक व्यक्ती नाही
सचिन कुणाच्या घरात नाही असे एक घर नाही
सचिन एक पर्व आहे जे कधीच संपणार नाही
सचिनचा खेळ हि साठवण आहे ती डोळ्यातून जाणार नाही
किती आले किती येतील पण  परत सचिन तेंडूलकर होणार नाही
खरंच! मला परत आता देवाला खेळताना  बघायला मिळणार नाही  :'(  :'(

Sunday, 17 November 2013

हल्ली मला कविता सुचतच नाहीत.....



कधी वाटते विषयच नाही
तर कधी वाटते मनातूनच येत नाही
असं काय झाल ते  काही कळत नाही
पण हल्ली मला खरंच कविता सुचत नाहीत

मग आज मात्र ठरवलं
कवितेवरच कविता लिहुयात
कविता म्हणजे नेमक काय
ते समजून तरी घेवूयात

मग गेले लिहित जे काही सुचेल ते
भरत राहिले शब्द जसे आठवतील तसे
जेव्हा बघितलं थोड थांबून,
कविता होत आली होती....

आणि मग समजल मला
कवितेला  विषय किंवा वेळ लागत नसतो
कविता म्हणजे कधी कधी
आतलाच आवाज असतो !



Friday, 4 October 2013

स्वार्थी होतात ना मुलं मोठी झाल्यावर ?



ज्या गोष्टी मी या कवितेतून मांडायचा प्रयत्न केला आहे, त्या  कधी न कधी प्रत्येकाला एकदातरी मनातून वाटल्याच असतील . Specially , जेव्हा तुमच्या Parents ना  तुमची गरज असते आणि तुम्हाला मनात असूनदेखील वेळ देता येत नाही.....:(




स्वतः च्या routine मधेच गुंतत  राहिलो आम्ही
घरातल्या आई-बाबांकडे  लक्षच नाही राहिले
बदलले वय आणि प्रसंग सुद्धा बदलून गेले
पांढरे झालेले केस त्यांचे आजच नव्याने जाणवले
सुरकुत्याना सुरुवात होवून  डोळे देखील आत गेलेले
म्हातारपण येतंय त्यांचे हे पहिल्यांदाच जाणवून गेले
स्वार्थी होतात ना मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले :'(

आमचे लहानपण,खेळ आणि कौतुक
त्यांनीही आमच्याबरोबर Enjoy  केले
शाळा आणि परीक्षांच्या tension  मध्ये
तरुणपण त्यांचे निसटून गेले  
आमच्या बेफिकीर मागण्यांसाठी
त्यांनी न पेलणारे खर्च अंगावर घेतले
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले ...

" चांगला शिक आणि मोठा हो... "
एवढीच अपेक्षा ते करत राहिले
भरलेल्या आनंदाच्या ओंजळी
आमच्या  हातात रिकाम्या  करत गेले
स्वतःचे time - table नव्हतेच त्यांना
जग त्यांचे आमच्याभोवतीच फिरत राहिले
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले...

आम्ही मोठे झाल्यावर उडून गेलो
ते तिथल्या  घरट्यात इकटेच  राहिले
त्यांचे दवाखाने, उतारवय आणि प्रॉब्लेम्स
ते न सांगताच निपटत राहिले
कितीतरी गोष्टींच्या आठवणी जपत
आमच्या सुखासाठी देवापुढे प्रार्थना करत राहिले
आणि एक कुठेतरी संपणारा प्रवास
शेवटी एकट्यानेच चालत राहिले....!
पण ...स्वार्थी होतात मुलं मोठी झाल्यावर
असं माझं मलाच वाटून गेले  :'(












Wednesday, 11 September 2013

तुला love marriage करावस का वाटल ग ?


" तुला love marriage  करावस का वाटल ग ? " या प्रश्नांवर एका मैत्रिणीने दिलेले उत्तर कवितेत मांडायचा प्रयत्न






प्रेम  हळूच होवून जाते
ठरवून केल जात नाही
ओढ असते दोन जीवांची
मन उगीचच गुंतत नाही

सहज येत ते आयुष्यात
निमंत्रण दिल जात नाही
आयुष्यच बदलून जात मग
आपल्या हातात काही राहत नाही...

गुंतले जरी धागे मनाचे
तरी प्रेमाचा अर्थ  सापडेलच असे  नाही
एकमेकांना समजून घेताना
सगळ्या गोष्टी पटतीलच असे नाही

तडजोड आणि खडतर  वाट
आयुष्यात कुणाला  चुकत  नाही
पण बाकी कशाचीच फिकर नसते
जोपर्यंत हातातला हात सुटत नाही

आपला आनंद  आणि आपले सुख
म्हणजे एक कोडे  आहे...
प्रेम म्हणजे फक्त 'अनुभव'
सांगेल तेवढे थोडे आहे...!









Tuesday, 10 September 2013

"वरलक्ष्मि" पूजा आणि हळदी-कुंकू

                   श्रावण महिन्यात एका गुरुवारी ऑफिस मध्ये राधिकाने सर्व ladies  staff  ला  "वरलक्ष्मि" पूजेच निमंत्रण दिले. Singapore ला शिफ्ट झाल्यानंतर मला बऱ्याच south - Indian  मैत्रिणी झाल्या आहेत, त्यामुळेच त्यांच्या cultural गोष्टी पण जवळून पाहायला मिळत आहेत.
                  शुक्रवारी सगळ्याजणी ऑफिस मधुन एकत्र तिच्या घरी जायचे ठरले. माझ्यासाठी हे नवीन असल्यामुळे  'ही  पूजा का असते' हे मी विचारलं.  तर नवऱ्याला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावं आणि घराला सुख-समृद्धी मिळून लक्ष्मि ची कृपा कायम आपल्यावर राहावी हा या पूजेच्या मागचा उद्देश! म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं तर " वटपौर्णिमा + मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मि व्रत "


                    तिने निमंत्रणात हळदी-कुंकू सभारंभ चा उल्लेख पण केला होता. मला लहानपणी आजीच्या किंवा आईच्या मागून परकर-पोलकं  घालून, नटून-थटून  जाणारी मी आठवू लागले..... तेव्हाचा हळदी-कुंकू समारंभाचा अर्थ म्हणजे खूप साऱ्या काकूंना भेटण आणि मसाले दुध पिवून घरी येण इतकाच होता.
जस जसे मोठे होत जावू तसे अर्थ किती बदलत जातात याचा मी विचार करू लागले...आणि लग्नानंतर तर तो अर्थ समजायला लागतो असे वाटले. आणि न कळत गौराई घरात घेतानाचे शब्द  आठवायला लागले...

ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी?
हळदी-कुंकवाच्या पावलांनी


ये ग गौराई
आले ग आई
 कशाच्या पावलांनी ?
हिरव्या चुड्याच्या पावलांनी


ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी?
मंगळसूत्राच्या पावलांनी


ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
भाजी-भाकरीच्या  पावलांनी


ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
धन-धान्य आणि मांगल्याच्या  पावलांनी


ये ग गौराई
आले ग  आई
कशाच्या पावलांनी
उदंड आयुष्य आणि चांगल्या  आरोग्याच्या पावलांनी


ये ग गौराई
आले ग आई
कशाच्या पावलांनी
सुख-समृद्धी आणि शांतीच्या पावलांनी !!


                    दोन सेकंद विचार केल्यावर वाटले, गोष्टी जपल्या तर आहेत. आज तिच्या घरी असे वातावरण होते कि जराही वाटत नव्हते कि आपण परदेशात आहोत .  एक खूप मस्त संध्याकाळ वाटली ,अगदी माहेरी हळदी कुंकवाला  जावून आल्यासारखी...!



Saturday, 31 August 2013

कुणीतरी

'त्या वयात ' प्रत्येक मुलीच्या मनात खूप काही साठलेलं असत ...मोरपंखी वय आणि स्वप्नाळू जग 'कुणाचीतरी' वाट पाहत असत ....अशा  मुलीला असणाऱ्या अपेक्षा या कवितेत मांडायचा एक प्रयत्न


       














भावनांना किंमत देणार हवं कुणीतरी
शब्दांना समजून घेणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल 'आता संपलंय सगळ '
'चल नवी सुरुवात करू ' म्हणणार हवं कुणीतरी

हातात हात घेणार  हवं कुणीतरी
आयुष्याच्या अंतापर्यंत तो धरणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल आता 'होणार कसं आता आपलं पुढ?'
'हात सोडू नकोस, मी करेन सगळ ' म्हणणार हवं कुणीतरी

मनाने नेहमी  जवळ असणार हवं कुणीतरी
न बोलता अंतरंग जपणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल आता एकटी पडले आहे मी
'मी आहे ग नेहमीच सोबत' असा धीर देणार हवं कुणीतरी...

संसारातली धावपळ तर रोजचीच असते पण
माझ्यासाठी वेळ  राखून ठेवणार हवं कुणीतरी
आणि जर गरज पडलीच कधी तर,
तीच वेळ थांबवाची ताकद असणार हवं कुणीतरी....!







Sunday, 18 August 2013

रक्षाबंधन



              आयुष्य हे खूप साऱ्या नात्यांनी गुंफलेलं असत ...अगदी एखाद्या सुरेख हारासारख. काही  नाती जन्माने मिळतात तर काही अगदी नकळत जुळतात. काही नाती जवळची असून सुद्धा मनापर्यंत पोहचत नाहीत आणि काही नाती खूप लांबची असून सुद्धा ऋणानुबंध संपत नाहीत...!
या सगळ्या नात्यांमध्ये अगदी जन्मापासून असणारं आणि मरेपर्यंत साथ देणारं कुठल नात असेल तर ते भाऊ आणि बहिणीच...! आज थोडं माझ्या आणि तुमच्या भावांविषयी लिहितेय,रक्षाबंधनाच्या निमित्ताने...

               लहानपणी आपण  सगळ्यात जास्त कुणाबरोबर राहिलो ? आई - बाबा -आजी-आजोबा-कि शिक्षक ?  नाही!!!  सगळ्यात जास्त आपण  भावाबरोबर किवा बहिणीबरोबर राहिलो...

               एकत्र उठलो, पहिला बाथरूम  आंघोळीला कुणाला यासाठी भांडलो ,एका ताटात जेवलो,एकत्र शाळेला गेलो, लहान भावासाठी पुस्तक जपून वापरली, एकत्र अभ्यास केला किंवा कधी घेतला, एकत्र खेळलो ,एकमेकांचे कपडे वापरले (आजही वापरतो), आणि कधी-कधी मारही एकत्रच खाल्ला!  नेमक्या शब्दांत सांगायचं तर एकाच घरात, समान आयुष्य आपण एकमेकांसोबत जगलो ...लहानचे मोठे आपण एकत्र झालो . आपल्यातले सगळे बदल, मग ते प्रगतीपुस्तकातले असोत किंवा वागण्यातले कुणी खूप जवळून अनुभवले असतील तर ते भावानेच!

                कितीतरी  गोष्टी असतात ना लहानपणीच्या आठवण्यासारख्या ?
                बागेमध्ये केलेले वाळूमधले किल्ले , चोर-पोलिसांचा खेळ, शेजाऱ्यांच्या घरात येणाऱ्या तक्रारी, थोडा जरी असला तरी  एकत्र वाटून खाल्लेला खाऊ, क्रिकेट मध्ये  'common  player ' वरून झालेली भांडण ,घरामध्ये मोठ्यांच्या झालेल्या भांडणात एकमेकांना दिलेला आधार, घरी कितीही एकमेकांना पाण्यात बघीतलं तरी बाहेर गेल्यावर सहजपणे घेतली गेलेली एकमेकांची काळजी,त्याला मारताना आडवं गेल्यामुळे खाल्लेला बाबांचा मार , उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये केलेली धमाल, वाढदिवसासाठी स्वतःहून तयार केलेलं ग्रिटिंग किंवा गिफ्ट, तिन्हीसांजेला म्हंटलेल 'शुभम करोति कल्याणंम ', शाळेमध्ये वाढदिवस झाल्यावर 'वाटून खायचं ' म्हणून खिशातच ठेवलेलं चोकलेट, त्याचं Gathering जवळून बघायला मिळावं म्हणून लवकर जावून पकडलेली जागा, हाताला हात धरून बरेचदा केलेला रोड-क्रॉस आणि तोच हात गर्दीत सुटला तर झालेली मनाची घालमेल....!

                 भाऊ  मोठा असला  तर  शाळेत  एखाद्या शिबिराला किंवा स्पर्धेला  नाव देताना स्वतःबरोबर आपले नाव ही न विसरता देईल ....teenage  मध्ये कधी make -up  मध्ये बघीतलं तर 'काय तोंड रंगवलं आहेस?'  अशी comment  देणारा भाऊ  'साडी डे' किंवा ' valentine day  ' ला अगदी न सांगता सोडायला येईल ....'हे काय विचित्र  कपडे घातले आहेस बदल ते पहिला' असे बाबांच्यापेक्षा धाकात सांगणारा तोच दादा   Fresher party  किंवा Farewell च्या रात्री १२-१ वाजेपर्यंत जागेल आणि वर सांगेल 'अग ,submission  होत , म्हणून जागा राहिलो '.....  तुमच्या प्रोजेक्ट च्या प्रिंट outs जर रात्री उशिरा मिळणार असतील तर तो न सांगता कलेक्ट करेल....किंवा तुमचे उद्या presentation  असेल आणि नेमका आधी २ दिवस आधी सेट-उप उडाला तर सायकल वरून भर दुपारच्या उन्हात तो तुम्हाला XP ची  CD  कुठल्यातरी मित्राकडून आणून देईल... तुमचे mobile  calls - friend  circles - तुमचा अड्डा या सगळ्या गोष्टींवर तो न कळतच लक्ष्य ठेवेल ...आणि जर कुठे चुकलात सर्वांसमोर  शिव्या घालायलाही कमी करणार नाही....  खरच, न सांगता आणि न दाखवता किती काळजी घेतात न आपले भाऊ ?

                  ज्या गोष्टी मोठ्या भावाच्या तशाच काही लहान भावाच्या सुद्धा ...! तो लहान असेल तर तुमच्याच हातून जेवेल,तुमच्याच कुशीत झोपेल....त्याला खेळायलाही तुम्हीच लागाल.... तुमच्या परीक्षा म्हणजे त्याच्यासाठी भयाण काळ ....त्याला रिक्षा मामा काय म्हणाले इथपासून कुठला मित्र बाद आहे इथपर्यंत तो तुम्हालाच share  करेल सगळ...कधीतरी ऐकूनच धक्का बसेल की त्याच्या मित्र-मैत्रीणींच्यात तुमचे सगळे सद्गुण माहित आहेत  :)  दीदी माझ हे कर, दीदी मला हेच पाहिजे ,आज तूच ये शाळेत सोडायला...एक न दोन गोष्टी....!

                 आपल्याला  भावाची आणि त्याला आपली किंमत तर नेहमीच असते, पण ती तेव्हा  कळते  जेव्हा आपण लग्न करून सासरी जाणार असतो... बहिणीच  लग्न काय ठरत आणि यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक पडतो...तो तुमच्याशी भांडण करायचं सोडून automatically Good -brother  बनतो...
तो तुमच्यासाठी कॉर्न-भेल पार्सल आणेल किंवा एरवी हात पण लावू न देणाऱ्या त्याच्या गाडीमधून / गाडीवरून फिरवून आणेल...कधीतरी तुम्ही त्याच्याकडे हट्टाने मागितलेली आणि त्याला खूप प्रिय असलेली गोष्ट तो तुम्हाला सहजच देवून टाकेल ...किंवा घरात तुम्ही नसताना आपले लहानपणीचे सगळे फोटो काढून बघत बसेल...लग्न ठरल्यावर धमकी म्हणून जरी तुम्ही म्हणालात कि,  'म्हण काय म्हणायचे ते , बोलून घे , आता थोडेच दिवस आहेत तुला बोलायला ' तर त्याच्या डोळ्यात नक्की पाणी येईल...आणि रोज अगदी सुट्टी संपत आल्यासारखा तो उठल्यावर एक एक दिवस ठरलेल्या तारखेतून कॅलेंडरवर वजा करत राहील...आठवणींची गोळाबेरीज करत...!!!

                    खर तर हे नातंच  अस आहे  कि तुम्ही अंतराने लांब आहात म्हणून लांब जात नाही किंवा लग्न झाल म्हणून  त्यामध्ये फरक पडत नाही.  जर कुठे तुम्हाला " माया,काळजी,ओढ ,आशीर्वाद ,निरागसता , परखडपणा ,निस्वार्थी प्रेम "  हे सर्व गुण  एकत्र पाहायला  मिळाल तर त्याला " भाऊ" अस नाव असेल...!!आयुष्य बदलत जात, तो निसर्गाचा नियम आहे . कधी कधी माणसंही बदलतात सोयीप्रमाण , पण तुमच्या मनात तुमच्या भावासाठी आणि त्याच्या मनात तुमच्या साठी असलेली जागा कायम तशीच राहते...

                     मला रक्षाबंधनाच्या दिवशी एवढच सांगावस वाटेल माझ्या Brothers ना



भावा, तू बरोबर असताना मला
माझाही आधार लागत नाही
तू फक्त  आनंदात आणि सोबत  राहा
आज मी दुसर काही मागत नाही...!!

रक्षाबंधनाच्या खूप खूप  शुभेच्या  : )



 

Sunday, 4 August 2013

मैत्री... एक न संपणारी ओढ !





सगळ काही मांडता येईल अशी हक्काची  जागा  असते
चांगला मार्ग दाखवून जाईल  असा एक वाटसरू असते
बालवयात अल्लड तर तरुणपणात खेळकर होते
तुमच्यातल  परिवर्तन जगणारी तुमचीच एक छबी होते
खरंच,मैत्री म्हणजे रक्ताच्या नात्याच्याही पलीकडे असते....!



विश्वासाच्या  पायावर भक्कमपणे उभी  असते
एकमेकांबरोबर सुंदर भावबंध गुंफत जाते
कठीण प्रसंगी जगण्यासाठी आधार देवून  जाते
दिवसरात्र मनात आठवणी  जागवत राहते
खरंच, मैत्री म्हणजे जुन्या वहीत जपलेलं मोरपीस असते  ....!



 गरज असताना एकटेपणात सोबत करते
दुखाच्या प्रसंगी सावली सारखी पाठीशी राहते
चुकलात तर हक्काने समजावून सांगते
जिंकलात तर अभिमानान मिरवून सांगते
खरंच,  मैत्री म्हणजे अळवाच्या  पानावरचा मोती असते  ....!


 जवळ असताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असते
अंतर असताना  कधी-कधी पापण्यांच्या  थेंबावर असते
 नदीसारखी निर्मळ,पावसासारखी बेभान असते
इंद्रधनुच्या रंगांप्रमाणे क्षितीज्याच्याही  पलीकडे असते
खरच, मैत्री म्हणजे न संपणारी ओढ  असते  ....!













Wednesday, 24 July 2013

वारी म्हणजे काय हो?



 वारी म्हणजे काय हो?

पायी पायी जावून घेतलेले  विठ्ठलाचे दर्शन
की माऊली माऊली जपत केलेलं भजन ?

टाळ आणि मृदंगाच्या तालावारचे रिंगण
की  देह-भान विसरून केलेलं नामस्मरण ?

संतांच्या गावातल्या पालखीच्या भेटी
की  नम्रतेन राहण्याचा अनुभव गाठी ?

तुळशी माळेसारखी दृढ  असणारी पांडुरंगाची ओढ
की स्वतःच घेतलेला सगुणाचा  शोध ?

संसार आणि परमार्थाचा घातलेला मेळ
की विश्वासान चालवलेला श्रद्धेचा खेळ ?

वारी म्हणजे,

प्रत्येकाला अंतर्मनाने  जोडणारा धागा
आणि  वारकर्यासाठी एक माहेरपणाची जागा...I







Thursday, 4 July 2013

आजही ...

मागच्या महिन्यात २० जूनला माझ्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाली.
एका मैत्रीणीने wedding  anniversary ला wish करून झाल्यावर विचारलं,
'काय ग, आता अहो बदलले आहेत कि नाही पहिल्या वर्षापेक्षा?'
तिच्या त्या वाक्यावर विचार करता करता सुचलेल्या काही ओळी....






आजही कधीतरी ऑफिसमधून घरी आल्यावर
तो पूर्ण घर पालथे घालतो
मी ज्या रूम मध्ये सापडते,
तिथे त्याचा लपंडाव संपतो

आजही बऱ्याचदा त्याला
डोळ्यांची भाषा जवळची वाटते
शब्दांची गरज भासावी
अशी त्याची इच्छाच नसते

आजही मी भांडणात लहान होते
आणि त्याचा मोठेपणा संपत नाही
माझ्या फालतू हट्टासाठी
त्याचे बाप होणे चुकत नाही

आजही लहान-मोठ्या प्रत्येक निर्णयात
त्याला माझे मत ऐकायचे असते
मी जबाबदारी घेत नाहीच कसली
तरीही त्याला सोबत हवी असते

आजही मी आजारी असताना
त्याचा चेहरा रडवेला असतो
माझ्यासाठी सुट्टी घ्यायला
जीव त्याचा धडपडत राहतो

आजही मला नवरोबा पेक्षा
एका मित्राची सुंदर साथ आहे
त्याच्या स्पर्शात मायेची
एक न संपणारी ऊब आहे !!


 

Wednesday, 26 June 2013

दिवस माझ्या मैत्रीचे


 (  शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले न विसरणारे दिवस असतात.
दंगा, मस्ती, खोड्या, शिक्षा आणि बरेच काही जगलेले दिवस....
या सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो मित्रांचा किंवा मैत्रिणींचा....!!
१० वी चा send off म्हणजे शालेय जीवनाचा अंतिम टप्पा.
ही कविता मी माझ्या १० वी च्या send off ला केली होती. अशीच एक आठवण ....)








माझ्या आयुष्याच्या वाटेवर
अनेक वेगवेगळी वळणे आली,
शालेय जीवनातील मैत्री
ही त्यातलीच एक सुंदर वाट झाली


या वाटेवर मी बागडले
रमले भान विसरून
मैत्रिणींच्या सुख-दुख्खात
एकमेकीना सोबत देवून





 मैत्री म्हणजे असते काय
हे पहिले जर मागे वळून
तर असे आठवतात ते सोनेरी दिवस
येतात डोळे भरून.....

दुसऱ्यासाठी जगायचे असते
हे मैत्रीनेच शिकवले
एकमेकींच्या आयुष्यातले
अनेक क्षण आम्ही वाटले





कधी रडलो, कधी हसलो
कधी स्वतःचे अस्तित्व हरवलो
आज मात्र निरोप देताना
सर्वजणी तितक्याच गहीवरलो

आज आम्ही त्या सुंदर वाटेला
निरोप देतो आहोत
एका सुंदर आयुष्याची
दारे बंद करतो आहोत






आजपासून मी पुन्हा तुमच्या
सहवासात असणार नाही
पण दिवस स्मरले मंतरलेल्या मैत्रीचे
तर आठवल्याशिवाय राहणार नाही.....!!!



 

Monday, 24 June 2013

स्वप्नांचे मृगजळ






मला सांगाल का स्वप्नांची
नेमकी सुरुवात होते कुठून?
लहान असल्यापासून की
समजायला लागल्यापासून?

जागेपणी पडणाऱ्या स्वप्नांची
लहानपणीच मनात कधीतरी सुरुवात होते
'मोठेपणी मी असा असणार'
हे प्रत्येकाने ठरवून ठेवलेले असते

ती स्वप्ने पूर्ण करायला मग
प्रत्येकजण धाव धाव धावतो
बरेच कष्ट घेतो आणि
बऱ्याच गोष्टी हरवून बसतो

एवढे सारे करून जर
ती स्वप्ने दूर पळत असतील
तर वाटते का बर मी
इतकी वर्षे हरवली असतील?

कधी कधी वाटते स्वतःकडून
आपणच खूप अपेक्षा ठेवल्या
त्या माझ्या नशिबात न्हवत्या
म्हणूनच पूर्ण नाही झाल्या....:(

शेवटी अशी एक वेळ येते
वाटते पाठशिवणीचा खेळ आहे सारा
कशासाठी बरे मांडून ठेवला
माझा मीच हा इतका पसारा?

स्वप्ने पाहणे म्हणजे उमजते
कि ते आहे केवळ 'मृगजळ'
कितीही जवळ पोचलो तरी
ते म्हणते "पळ पळ".....!




 

Saturday, 8 June 2013

पाऊस....

पाऊस आणतो बेभान  वारा
पाऊस आणतो कोसळणाऱ्या धारा
पाऊस चिंब ओल्या मनाचा थाट
पाऊस म्हणजे विजांचा कडकडाट









पाऊस येतो घेवून हिरवे रान
पाऊस होतो पक्षांची तान
पाऊस म्हणजे ओला सुवास मातीचा
पाऊस म्हणजे कायापालट निसर्गाचा..!





पाऊस  लहानांसाठी होडी होतो
पाऊस  तरुण मनाची गोडी होतो
असा हा पाऊस तन -मनाला डोलवतो,
असा हा पाऊस सर्वांनाच वेड लावतो...!











पाऊस होतो  शेतकऱ्याला संजीवनी
पाऊस आणतो  फुला-झाडांना पालवी
पाऊस झाडतो मनाची मरगळ
पावूस देवून जातो आनंद निरंतर...!






Sunday, 26 May 2013

पण माणस दुरावत चालली आहेत....









वाद  टाळता टाळता
संवादच खुंटत चालला आहे
जग जवळ येत चाललाय
पण माणस दुरावत चालली आहेत  ||

आज पैसा खेळतोय भरपूर
पण हात आखडत चालला आहे
चेहर्यावरती हसू दिसतंय
पण समाधान हरवत चालल आहे ||

नाती-गोती आप्तजन आहेत
पण त्यांची परिभाषा बदलते आहे
देण्या आणि घेण्यामध्येच
सारे स्नेह गुंतले आहेत ||

सुख-सोयीनी आयुष्याचे मार्ग
सोपे सरळ बनले आहेत
पण हे सुद्धा आताच्या पिढीला
चालणे अवघड होते आहे ||

कितीही सोडवला गुंता तरी
तो अजूनच घट्ट वाढत आहे
जग जवळ येत चाललाय
पण माणस दुरावत चालली आहेत  ||

Thursday, 16 May 2013

येणार का ?


 


 

हिरवी  हिरवी शेती
डोळ्याला सुखावणारी
शांत वाहणारी नदी
मनाला विसावा देणारी
उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांची
आनंद  यात्रा  ऐकायला
येणार का तुम्ही
आमच्या गावी राहायला?






गार झुळूक वार्र्याची
हवेतून गोडवा वाटणारी
साधी सोपी माणस
देवावर श्रद्धा असणारी
चमचमणाऱ्या चांदण्या
अंगणात झोपून पाहायला
येणार का तुम्ही
आमच्या गावी राहायला?










 दिवसाची सुरुवात
हसत  हसत होणारी
गजबजलेला  दिवसच
आनंदात घालवणारी
 रात्रीचे अभंग ऐकत
सुट्टीची मज्जा करायला
येणार का तुम्ही
आमच्या गावी राहायला?

अश्रू



तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर
त्याला खूप त्रास होतो
तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी
तो वादळ पेलायची ताकद ठेवतो....

Sunday, 28 April 2013

आता दिवस थोडेच राहिले....




( ती पुढच्याच आठवड्यात भावाच्या लग्नासाठी चांगले १५ दिवस निघाली आहे माहेरी...
Bag  भरता भरता तिने 'अहो' ना मारलेले टोमणे कवितेच्या स्वरुपात....)





स्वयंपाक घरात काम करताना
मोठ्या कौतूकान बघून घे
आता दिवस थोडेच राहिले
माझ्या हातच जेवून घे ||

माझ्या फालतू विषयांच्या गप्पा
'Timepass ' समजून ऐकून घे
आता दिवस थोडेच राहिले
एकदाच बोअर होवून घे ||

मी आवरताना आरशाच्या मध्ये मध्ये
मला अडथळा आणून घे
आता दिवस थोडेच राहिले
माझ्याशी पाहिजे तेवढ भांडून घे ||

कधी चीडचीड तर कधी लाड
गम्मत - मस्ती करून घे
आता दिवस थोडेच राहिले
हक्क अधिकार गाजवून घे ||

कधी आनंदान तर कधी दुखान
मिठीत माझ्या रडून घे
आता दिवस थोडेच राहिले
tension  हलक करून घे ||

आता चेहरा पाडून बसू नकोस असा
आठवण आली तर न्यायला ये,
'तू तिथ मी' नेहमीच असेन
हे न सांगताच समजून घे ||

Sunday, 21 April 2013

थोडे मनातले



थोडे मनातले....जे लिहावेसे वाटले असे
थोडे मनातले ....जे सांगावेसे वाटले असे
थोडे मनातले ....जे आठवावेसे वाटले असे
थोडे मनातले ....जे वाटावेसे वाटले असे
थोडे मनातले....तुमच्या आणि माझ्या  !!!


Friday, 19 April 2013

" रम्य ते बालपण "





पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||






आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा  मुग्ध होई
मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||


७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे
बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||


खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world  cup  ची मज असे
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||


शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||


स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस,college,tution  च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||


आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही
आजच्या फोर व्हीलर long  drivela
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या face बुक chatting  ला नाही
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले  || ६ ||





सौ प्राजक्ता पवार-पाटील
२५ / ३ /२०१३